
(शहापूर: अनिल भेरे):मृत्यूचे आगार असलेल्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने अल्यानी येथील कु, राणी(रोहिणी) हरिश्चंद्र निमसे या 19वर्षीय मुलीचा 4 जून रोजी सर्प दंशाने मृत्यू झाला आहे, रात्री तीन वाजताच्या च्या सुमारास माळरानाच्या घरात आईवडिलांसमवेत झोपली असताना मण्यार जातीच्या सापाने राणीला दंश केला, तिच्या वडिलांनी तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रथोमपचार सुरु केले मात्र आयसीयु बेड व इतर सोईसुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले मात्र तिची रस्त्यामध्येच प्राणज्योत मावळली. राणी ही आरमाईट कॉलेज शहापूर येथे इंजिनीअरिंग चे शिक्षण घेत होती.तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .काही दिवसापूर्वी पेंढरघोळ येथील चौदा वर्षीय मुलाचा सर्प दंशाने उपचारा अभावी मृत्यू झाला होता त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार कपिल पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन सोईसुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या होत्या मात्र खांद आलेल्या बैलासारख आरोग्य प्रशासन मान टाकत प्रशासनाचा गाडा हाकण्यास असमर्थ ठरत आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र या बाबींकडे लक्ष न देता हळदी, लग्नसमारंभ, वाढदिवस, मुंज अशा कार्यक्रमात उपस्थित राहून आपण सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत या अविर्भावात राहून यातच आपली धन्यता मानत आहेत.