(उल्हासनगर): – उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ३८ तर शिवसेनेचे ३६ उमेदवार निवडून आले असून वंचित बहुजन आघाडीचे २ काँग्रेसचा १ आणि साई पक्षाचा १ उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाला आपले खाते उघडता आले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीत शहरातील मोठ्या दिग्गजांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. नागरिकांनी नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. मतदानाच्या दिवशी कित्येक ठिकाणी मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मतदारांना पैशाचे वाटप करणाऱ्यांवर कारवाई केली.
पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे आहे.
भाजपा ३७, शिव सेना ३६, वंचित बहुजन आघाड़ी २, साई पार्टी १, कांग्रेस १, अपक्ष १
उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या राजकीय पक्षांचे पक्षाची आकडेवाडी पुढील प्रमाणे आहे.
प्रभाग क्र १ मध्ये शिव सेना – २ भाजपा – २, प्रभाग क्र २ मध्ये शिवसेना – १ भाजपा – ३, प्रभाग क्र ३ मध्ये शिवसेना – ४, प्रभाग क्र ४ मध्ये शिवसेना – २ भाजपा – २, प्रभाग क्र ५ मध्ये शिवसेना – २ भाजपा – २, प्रभाग क्र ६ मध्ये शिवसेना – ४, प्रभाग क्र ७ मध्ये शिवसेना – ३ भाजपा – १, प्रभाग क्र ८ मध्ये भाजपा – ४, प्रभाग क्र ९ मध्ये भाजपा -१ शिवसेना – २, प्रभाग क्र १० मध्ये शिवसेना – ३ भाजपा – १, प्रभाग क्र ११ मध्ये भाजपा – ४, प्रभाग क्र १२ मध्ये भाजपा – ३ अपक्ष – १, प्रभाग क्र १३ मध्ये शिवसेना – ४, प्रभाग क्र १४ मध्ये शिवसेना – ४, प्रभाग क्र १५ मध्ये शिवसेना – ४, प्रभाग क्र १६ मध्ये भाजपा – ३ साई पार्टी – १, प्रभाग क्र १७ मध्ये भाजपा – ४, प्रभाग क्र १८ मध्ये वंचित – २ भाजपा – १ कांग्रेस – १, प्रभाग क्र १९ मध्ये भाजपा – ३ शिवसेना – १, प्रभाग क्रं = २० मध्ये भाजपा – ३ उमेदवार निवडून आले आहेत.
ही निवडणून पॅनल पद्धतीने घेण्यात आली होती त्यामुळे एकूण २० पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती यात प्रत्येक पॅनल मध्ये अ ब क ड अशा प्रकारे चार उमेदवार निवडून आलेत. मात्र पॅनल क्रमांक ९ आणि पॅनल क्रमांक २० मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आलेत.
या निवडणुकीदरम्यान कित्येक पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात, भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेत, मनसेच्या नेत्यांनी भाजपात अशा प्रकारे कित्येकांनी आपले वर्चस्व टिकविण्यासाठी पक्षांतर केले यात कित्येकांना यश आले तर काहींना अपयशाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेनेने पप्पू कलानी यांच्या टीम ओमी कलानी (टी ओ के) तसेच पप्पू कलानी याचे एकेकाळचे निकटवर्ती जीवन ईदनानी यांच्या साई पक्षाशी युती केली होती. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीला आपले खाते उघडण्यास यश प्राप्त झाले आहे. तर काँग्रेसला मात्र एक उमेदवारावर समाधान मानावे लागले आहे.
आता उल्हासनगर महानगर पालिकेचे महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावेदारी केलेली आहे. परंतु महापौर होण्याचा मान कोणाला मिळणार हे मात्र येणारा काळ सांगेल. यामध्ये भाजपाचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर उल्हासनगर महानगर पालिकेच्या महापौर पदाचे कोडे सुटणार असल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही नेते कोणता निर्णय घेतात याकडे उल्हासनगर वैद्यांचे लक्ष लागले आहे.