(शहापूर ):शिरवंजे गावातील जेष्ठ नागरिक कै,हरी गोविंद हरड यांचे सोमवार दि,12 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे, मृत्यूपश्चात त्यांचे वय 92 वर्ष होते.
शेतीव्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय व त्याकाळी हलाकीच्या परिस्थितीत डोक्यावर पाटी घेऊन विभागात भाजीपाला विक्रीचे प्रामाणिक काम करून संसाराचा गाडा हाकत मुलांना होतकरू बनविले, वयाच्या बंधनाने स्वतःला थांबवून घेत त्यांनी अध्यात्माची कास धरली, आयुष्यभर वारकरी सांप्रदायाचे अनुयायी राहिलेल्या बाबांची पंचक्रोशीत हरी बुवा म्हणून ओळख होती,
शिरवंजे ग्रामपंचायतीच्या विविध योजनांसाठी त्यांचा जेष्ठ नागरिकत्वाचा दाखला देत ग्रामस्थांची कामे सुकर झाली असून,त्यांच्या हातून हे समाजकार्य ही घडले आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले दोन मुली 14नातवंडे,15 पतवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या निधनाने परिवारावर शोककळा पसरली आहे,
तरी त्यांचा दशक्रिया विधी बुधवार,21जानेवारी रोजी श्री गोरक्ष नाथ मठ चेरवली येथे,व उत्तरकार्य विधी गुरुवार दि, 22जानेवारी रोजी शिरवंजे येथे करण्याचे हरड परिवाराने कळविले आहे.