(ठाणे ):10 जानेवारी :अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्तास्थापनेत मोठा बदल झाला आहे, कालपर्यंत भाजपसोबत अंबरनाथ विकास आघाडी हा गटस्थापन केल्यामुळे काँग्रेस मधील निलंबित झालेले बारा नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापने ची स्वप्ने पाहत होते असे असताना भाजप आणि काँग्रेसची स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे 27 राष्ट्रवादीचे चार अन अपक्ष एक असे 32 नगरसेवक मिळून एक गट स्थापन करून सत्ता स्थापनेची रणनीती आखल्याची माहिती मिळत आहे. कालपर्यंत भाजपाच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं आहे त्यामुळे शिवसेनेची अंबरनाथ वरील सत्ता कायम राहणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 27 उमेदवार निवडून आले होते 1 अपक्षाच्या मदतीने शिवसेनेचे संख्याबळ 28 वर पोहोचले होते सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आणखी दोन उमेदवारांची गरज असताना किंगमेकर च्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांनी भाजपाला समर्थन दिले त्यात काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपाची संख्या 15 वरून 31 वर पोहोचली होती सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल बसेल असं वातावरण असताना गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी अचानक शिवसेनेला समर्थन दिलं त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 32 झाले असून उपनगराध्यक्ष व विशेष समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत त्यामुळे सिंह गेला असला तरी गड राखण्यात मात्र शिवसेना यशस्वी झाली आहे.