शहापूर : लोक हिंद वृत्त वाहिनी, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ व साप्ताहिक शिवमार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील ज्ञानदेव सेवा मंडळाच्या सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे दि, 17 मे रोजी आयोजन करण्यात आले होते, यात राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 50 व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रशासकीय सेवेसह सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांच्या हक्काच्या योजनांची माहिती देत त्यांना लाभ मिळवून देणारे कार्यतत्पर लोकसेवक, शहापूर पंचायत समितीचे वरिष्ठ लिपिक मेघराज विठ्ठल निमसे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सुधाकर राव नाईक स्मृती लक्षवेधी लोकसेवक पुरस्कार तर राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व बांधकाम व्यवसायात प्रसिद्ध असलेले अनिल अरुण गगे यांना नानासाहेब धर्माधिकारी समाजभूषण पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले.
यावेळी झी 24 तास, ibn लोकमत चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास भाऊ बांगर नगरसेवक राजेश मोरे,धीरज सांबरे,आवाज महाराष्ट्राचा फेम महेश कंठे,माजी उपसभापती व लोक हिंदचे वृत्त संपादक महेश कुमार धानके, पुरस्कार समिती प्रमुख किसन बोंद्रे यांच्या शुभ हस्ते अनेक पुरस्कार्थींचा सन्मान करण्यात आला.