(ठाणे 31ऑगस्ट ):ठाणे पोस्टल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., ठाणे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३०ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:00 वाजता , ब्राह्मण सभा हॉल ठाणे,(पश्चिम) येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाली व यशस्वीरीत्या पार पडली.
ही सभा अध्यक्ष श्री. सुनील झुजारराव (माजी चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री. राजेंद्र पाटील, सचिव श्री. संतोष कदम, खजिनदार श्री. संदीप शेंगदाणे, संचालक श्री. योगेश हरड तसेच सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती.
तसेच सोसायटीचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेची शोभा वाढवली. सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा अत्यंत आनंददायी, सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सर्व सभासदांचे उपस्थिती, सहकार्य आणि विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“एकजूट, विश्वास आणि सहकार्य — हीच आपल्या सोसायटीच्या प्रगतीची खरी ताकद!”
व्हाइस. चेअरमन. विनोद खैरनार, दयानंद भेरे, पंकज विशे, बाबा पठ्ठाणकुडे, महेश पाटकर, नागेश राणे, सचिन सानप, रुपेश नगरकर, रोहिणी नाईकसाटम, निविदिता कदम, राजेंद्र नॉर्वेकर, बाळा पाटील,सुनील चेन्ने हे उपस्थित होते.