
(शहापूर ):दरवर्षी आपल्या लेकीच्या वाढदिवशी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखत समाजाला सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे पर्यावरण प्रेमी, शहापूर तालुक्यातील किन्हवली शेजारील परटोली गावचे उपक्रमशील पोलीस पाटील व प्रगतशील शेतकरी राजेश ढमके यांनी यावर्षीही त्यांची लेक “युवांश्री” हि शिकत असलेल्या आदर्श शाळेच्या आवारात केशर आंब्याची झाडे लावून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला, त्याचबरोबर त्यांच्या मालकीच्या जागेतही शंभर फळझाडे लावून 21जुलै रोजी वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजेश ढमके हे संवेदना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक,शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत असतात.युवांश्रीच्या वाढदिवशी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी माहेश्वरी भोसले यांचे ढमके यांना वेळोवेळी कृषिविषयक मार्गदर्शन लाभते,लेकीच्या संगोपणा सोबत झाडांनाही त्यांच्या पायावर उभे करून संगोपन व निगा राखण्याची ग्वाही ढमके यांनी दिली.
या वेळी संवेदना प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष भिवा काका वेखंडे, खजिनदार भगवान वेखंडे, सदस्य संदीप देसले, सहाय्यक कृषी अधिकारी माहेश्वरी भोसले, मुख्याध्यापिका सुजाता धानके व शिक्षक वृंद उपस्थित होते.