शहापूर, दि. २३ जुलै २०२६ :
(प्रतिनिधी ):दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी 22जुलै रोजी शहापूर येथे *विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते.*
हे आंदोलन कोणत्याही *राजकीय पक्ष, संघटना* किंवा *डाव्या-उजव्या विचारसरणीच्या प्रभावापासून* दूर ठेवून पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेतील *पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता* आणि *विद्यार्थ्यांच्या भविष्याशी* संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित केले.
यावेळी वक्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराबाबत नाराजी व्यक्त करत या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलन *शांततापूर्ण, शिस्तबद्ध* आणि *संविधानिक मार्गाने* पार पडले. सहभागी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय रंग न देता न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
आयोजकांच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व *विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन की ज्यांनीं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले* आणि *शहापूरकर नागरिकांचे* आभार मानण्यात आले.
*मुख्य मागण्या :*
1. NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
2. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
3. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची चौकशी करण्यात यावी.
4. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता व सुरक्षितता आणण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी व शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी हा लढा संविधानिक मार्गाने पुढेही सुरू राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.