बदलापूर, दि.28 प्रतिनिधी
(प्रतिनिधी ):बदलापूर प्रभाग क्र.१ मधील शांतीनगर परिसरात सकाळी पैशांनी भरलेली पाकिटे मतदारांना वाटल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या (अजित पवार गट) महिला कार्यकर्त्या मतदारांना अशी पाकिटे देत असल्याची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी त्या महिलांना थांबवून त्यांना जाब विचारला. यावेळी या प्रकारावरून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम म्हात्रे यांच्यातही जोरदार बाचाबाची झाली. संबंधित पाकिटांमध्ये प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम साधारणता शंभर पाकिटे असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.
मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत विरोधकांनी आम्हाला बदनाम करण्यासाठी रचलेला राजकीय डाव असल्याचा दावा केला.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे आणि परिस्थिती सुरळीत करण्याचे काम पोलिसांनी केले.पाकिटांतील रक्कम, त्यामागील हेतू आणि वितरित करणाऱ्यांची ओळख या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे बदलापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.