(शहापूर ):दि 1मार्च :ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वी.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा 27फेब्रुवारी हा जन्म दिवस, याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून खरिवली शाळे मध्ये कवी आपल्या भेटीला हा कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परिषद व जि प केंद्र शाळा खरिवली सो यांच्या संयुक्त विद्यमाने मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हरड सर , उपाध्यक्षा सौ वेदिकाताई हरड ,माजी अध्यक्ष दत्तात्रय हरड, शिक्षण प्रेमी तातू हरड ,सन्मा.बाबाजी उबाळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री सतीश हरड, श्री किशोर हरड, श्री ज्ञानेश्वर हरड ,श्री भरत हरड, श्री मुकेश हरड, श्री सचिन उबाळे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या- सौ निकिता हरड, सौ सरिता हिलम ,सौ चित्रा हरड, सौ दीपिका हरड ,सौ स्वाती हरड, सौ मंदाबाई हरड, सौ रोहिणी हरड यांच्या उपस्थितीत व सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री चंदन फुलपगार यांनी “लाभले आम्हास भाग्य” या मराठी अभिमान गीताने सुरुवात करून कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.मराठी शब्दकोश तयार करणारे ,मराठी भाषेला राजाश्रय देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य की शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे ईशस्तवन ,स्वागत गीत व देशभक्तीपर गीत पेटी आणि ढोलकीच्या तालावर सादर केले.
खरीवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजेश राठोड सर यांनी सर्व उपस्थितितांचे स्वागत केले. शाळेच्या शिक्षिका सौ पूनम तारमळे मॅडम, स्वयंसेवी शिक्षिका कुमारी अश्विनी हरड, कुमारी प्रगती उबाळे यांनी सर्व महिला भगिनींचे स्वागत केले..
तदनंतर श्री चंदन फुलपगार सरांनी मराठी भाषेचा इतिहास काव्यमय रीतीने सांगितला.शाळेतील विद्यार्थी कुमारी तनया देसले, कुमारी पूर्वा हरड, कुमार मिलिंद निमसे,या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे कविता सादर केल्या आणि बक्षीस मिळवली…
कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे निवेदन कवी, लेखक सन्मा. संजय गंगे खरिडकर* यांनी केलं.या कार्यक्रमात श्री राजेश देसले सर विजय धानके सर कवी मदन देसले सर कवी अशोक चौधरी सर आणि कवी संजय गगे सर या सर्व कवींनी मराठी भाषा गौरव दिन, विद्यार्थी प्रेरणा ,मराठी शाळा, आई- वडील आणि आपल्या आवडीची कविता सादर करून अगदी दोन तास सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, मान्यवरांना मंत्रमुग्ध करत खीळवून ठेवलं.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हरड सर यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाचे कौतुक केले…
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कवींचे कोकण मराठी साहित्य परिषद प्रमाणपत्र ,शाल, पुष्पगुच्छ लेखणी व विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्प सर्व मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. तदनंतर सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून या सुंदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पालक, माजी विद्यार्थी संघ ,केंद्रप्रमुख आणि शाळेचे सर्व शिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले.