प्रशासकीय बदलीच्या निरोप समारंभात शिक्षकाची शाळेसाठी आर्थिक मदत…
शिक्षक अशोक उमवणे यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ ..


(किन्हवली): 29 नोव्हेंबर: विध्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबरोबर शाळेचाही भौतिक विकास व सर्व सुखसोई निर्माण करत,विद्यार्थ्यांचा बौद्धिक आलेख उंचावत पालकांच्या ही मनात शाळेप्रती आस्था निर्माण करणारे जिल्हा परिषद शाळा शिरवंजे येथे गेली बारा वर्षे ज्ञानदानाचे काम करत असलेले आदर्श शिक्षक श्री अशोक उमवणे गुरुजी यांची प्रशासकीय बदली झाल्याने शिरवंजे ग्रामस्थ, शिवतेज मित्र मंडळ, सरपंच ग्रामपंचायत,विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांच्या तर्फे सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
नवरात्रौत्सवाचा जागर होत असताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उमवणे सर यांनी गावातील सुखदुःखाचे प्रसंग,तंबाखू मुक्त गाव, व्यसनमुक्त गाव, या बाबतीत परिवर्तन केले, गरीब आणि होतकरू विद्यार्थांसाठी मदत मिळवून दिली, सण,उत्सवाच्या, कर्मकांडाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तोच पैसा गावच्या आणि शाळेच्या विकासासाठी निधी उभा करून शाळेच्या सर्व सोयी पूर्ण केल्या आहेत, गणपती उत्सवातील डीजे फटाके इ,बाबतीतील पैसा वाचवून लोक सहभागातून त्यांनी शाळेसाठी मागील वर्षी 25 हजार रुपयांचा टीव्ही भेट स्वरूप दिला आहे.बदली झाल्याने शाळेचा निरोप घेताना त्यांनी गावात एक नवीन संकल्प सुरू केला आहे .नवरात्री मधील खर्चात कपात करून उरलेला तोच पैसा गावातील गरीब आणि होतकरू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करावा, आणि या संकल्पाचा शुभारंभ म्हणून त्यांनी स्वतः ११हजार रु मदत दिली आहे ,निरोप समारंभात विद्यार्थी, पालक,शिक्षक यांची समर्पक मनोगते झाली.यामध्ये श्रीमती कांताताई भेरे,श्री प्रकाश भेरे, जगन शिंदे,रविंद्र हरड, राजेश देसले सर, यांची मनोगते हृदयात घर करून गेली, कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन महेंद्र हरड सर यांनी केले, कार्यक्रमाच्या आयोजनात शिवतेज मित्र मंडळ, श्री दिनेश बर्डे, दीपक हरड,विलास भेरे मनोज हरड, सुभाष शिंदे,बुधाजी दलाल,अध्यक्ष सौ कमलताई शिंदे, सौ,मीनाताई दलाल, विश्वास लाटे सर यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमासाठी सरपंच सौ वासंती ताई पवार, सदस्य सौ अलका भेरे, चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती ,गावातील सर्व ग्रामस्थ , माजी विद्यार्थी ,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

