शहापूर :20सप्टेंबर रोजी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या वार्ताँकनासाठी साठी गेलेले झी 24तासचे योगेश खरे साम टीव्हीचे अभिजित सोनवणे पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर उभ्या असलेल्या गावगुंडानी दगडफेक व लाथाबुक्क्यानी भीषण हल्ला केला यात किरण ताजने गंभीर रीत्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.याच्या निषेधार्थ शहापूर येथील समस्त पत्रकारांनी पंचायत समिती येथील शिवतीर्थावर एकत्र येत काळ्या फिती लावून शिवतीर्थ ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मुकमोर्च्या काढण्यात आला, यावेळी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांच्याकडे आरोपीना पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली , यावेळी शहापूर मधील इलेक्ट्रॉनिक, प्रिंट युट्युब व इतर माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निषेधात राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाने आपला सहभाग नोंदवला.