ठाण्यातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत ऑनलाईन गेमिंग सुरु असून पोलीस प्रशासन तक्रारी करून कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याने त्याचे पडसाद विधानपरिषदेमध्ये उमटले. आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडून हा मुद्दा उपस्थित केला.
ठाणे पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात कसीनो, गेमिंग, लॉटरी, जुगारा सारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरु होते, वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते,डावखरे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली तरीही पोलिसांचा वरदहस्त असलेल्या धंदेवाल्यांनी धंदे सुरूच ठेवले, त्याच वेळी ठाण्यातील समाजसेवक, मराठा प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश मोरे यांनी पत्रकारांच्या फौजफाट्या सह प्रत्येक अवैध धंद्यावर जाऊन त्याचे चित्रीकरण करत सत्य बाब निदर्शनास आणून दिली.
ऑनलाईन गेमिंग मुळे शाळा कॉलेज तरुणाईला व नोकरदार वर्गाला आर्थिक लोभ दाखवून त्यांचे जीवन व संसार उध्वस्त होत असून कित्येकांना नैराश्यातून आपला जीव गमवावा लागला आहे व या गेमिंगच्या खेळात फसवणूक होत असल्याचा आरोप महेश मोरे यांनी केला आहे.