(किन्हवली): 25 जुलै: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या वाढदिवशी पुष्पगुछ किंवा भेटवस्तू न आणता सामाजिक उपक्रम राबवा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केले होते, त्यानुषंगाने भाजपाचे शहापूर तालुका ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरड सर यांच्या नेतृत्वामध्ये किन्हवली येथे 24 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
किन्हवलीच्या आप्पासाहेब भानुशाली महाविद्यालय येथे शहापूर ग्रामीण पूर्व मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप नेते माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर शेठ जाधव, भाजप नेते गणेश शेठ राऊत,विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी दत्तात्रय करण, भाजपचे शहापूर ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरड सर, किन्हवली महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबराव धनवटे,भाजपचे किन्हवली शहर अध्यक्ष महेश शेठ पतंगराव, किन्हवली ग्रामपंचायत सरपंच कैलाश डोंगरे आदि उपस्थित होते.
कल्याण बापगाव येथील लाइफलाइन ब्लड सेंटर यांच्या तर्फे रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
*यावेळी रक्तदात्यांना भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.*
या रक्तदान शिबिरास किन्हवली ग्रामपंचायत सदस्य अजय चौधरी,भाजपा तालुका उपाध्यक्ष मगन मलिक, तालुका चिटणीस शंकर वेखंडे, नित्यानंद धानके,नडगाव सरपंच जयवंत वाघ, दाजी वाघ,भाजपा अनुसूचित मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण,चिखलगाव सरपंच बाबू वाघ, शिरवंजे माजी सरपंच यशवंत फर्डे ,भाजपा किन्हवली विभाग अध्यक्ष रविंद्र आवार, युवा मोर्चाचे सरचिटणीस रुपेश हरड,चिखलगाव उपसरपंच दामोदर देसले, संकेत भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते