(किन्हवली)17 जुलै :शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच किन्हवली सहकारी सेवा संस्थेचे चेअरमन, किन्हवली भाजपा शहराध्यक्ष महेश पतंगराव यांच्या वाढदिवसानिमित दि,16 जुलै रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यात शहापूर भाजपचे मा,तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या यांच्या तर्फे सोगाव विद्यालयास १० फॅन भेट देण्यात आले व महेश पतंगराव यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊचे वाटप केले विध्यार्थ्यांमध्ये भाजपच्या समस्त कार्यकर्त्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप नेते भास्कर शेठ जाधव व शहापूर तालुका ग्रामीण पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरड सर, शहापूर ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन महेश पतंगराव यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिरवंजे गावचे मा. उपसरपंच मगन मलिक, रविंद्र आवार, किशोर चव्हाण, रुपेश हरड, नित्यानंद धानके, प्रशांत जाधव उपस्थित होते.