(ठाणे ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांशी योजना हर घर जल से नल म्हणजेच “जल जीवन मिशन ” ही योजना पन्नास टक्के केंद्र हिस्सा व पन्नास टक्के राज्य या तत्वावर राबविण्यात येत होती केंद्र शासनाने आपला हिस्सा यापूर्वी राज्यशासनाकडे वितरित केला होता यात काही अंशी निधी ठेकेदारांना धावत्या बिला स्वरूपात देण्यात देण्यात आला व काही लाडकी बहीण पोसण्यात खर्च केला.
उर्वरित हिस्सा राज्य सरकारने देऊन योजना पूर्ण करण्यात यावी तसे पत्र केंद्र शासनाने राज्यसरकारला मागील महिन्यात जारी केली होते मात्र पावसाळी अधिवेशनात याबत कोणत्याही लोकप्रतिनिधीने हा विषय पटलावर घेतला नाही त्यामुळे ही योजना राबविण्यास राज्य शासनाची उदासीनता दिसून येत आहे,
ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामे करणाऱ्या सर्व ठेकेदारांना येत असलेल्या अनेक अडचणी बाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांचे वतीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांना दिनांक 7.7 2025 रोजी लेखी निवेदन दिले होते ,त्या अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निवेदनावर चर्चा करण्यासाठी दिनांक 14.07.2025 रोजी वेळ दिली होती तथापि काही अपरिहार्य कारणास्तव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर वेळ बदलून पुन्हा दिनांक 16.7.2025 रोजी दुपारी 2.00 वाजता वेळ दिली व त्या अन्वये दिनांक 16.07.2025 रोजी जिल्हा परिषद ठाणे येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद ठाणे यांच्या दालनात ठाणे जिल्हा जल जीवन मिशन अंतर्गत काम करणारे सर्व ठेकेदार हे दिलेल्या वेळेप्रमाणे दुपारी 2.00 वाजता उपस्थित राहिले , यावेळी मा. श्री मंगेश आवळे साहेब, विभागीय अध्यक्ष, (ठाणे पालघर )महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांची प्रमुख उपस्थिती होती तथापि मीटिंगमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद ठाणे हे दोघे ही अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या वतीने सौ.चेतना मॅडम ,उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांनी मीटिंग घेतली परंतु मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांना दिलेल्या निवेदनातील अडचणी बाबत चर्चा करत असताना समर्पक व योग्य उत्तरे न मिळाल्याने तसेच सदर मीटिंगमध्ये सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याकारणाने यापुढे सर्वानुमते दि. 22.7.2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करून या बाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला व यास सर्व उपस्थित ठेकेदारांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभाग देण्याचे ठरविले आहे . या मीटिंग प्रसंगी मा. श्री मंगेश आवळे साहेब ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, यांनी जिल्ह्य़ातील उपस्थित सर्व कंत्राटदारांना मार्गदर्शन केले…व जिल्हा परिषदेच्या या उदासीनते विरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन केले.या ठिकाणी
श्री कल्पेश केणे ,श्री पी. एन. पाटील, श्री भगवान भोईर ,श्री निलेश पाटील अनिकेत घलपे,श्री कौस्तुभ राणे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील पाच ही तालुक्यातील जल जीवन मिशन चे कामे करणारे कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.