Oplus_131072
किन्हवली : किन्हवली परिसरातील मोहिपाडा गावातील सुजाता शिवाजी देसले या शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. किन्हवली पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी हे रब्बी हंगामात काकडी भेंडी, तूर, हरभरा व इतर कडधान्याचे उत्पन्न घेत आपला उदरनिर्वाह भागवत असतात दि, 8 फेब्रुवारी रोजी ही महिला दुपारच्या वेळेस भेंडी तोडण्यासाठी गेली असता अतिविषारी सापाने दंश केला, उपचारासाठी त्यांना किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तपासाअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ,
सुजाता ह्या सन 2022-23 च्या चिखलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्र, 3 मधून निवडणूक जिंकून ग्रामपंचायत विद्यमान सदस्यपदी विराजमान झाल्या होत्या, त्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय कुमार देसले यांच्या भावजई तसेच तसेच आदर्श निवृत्त शिक्षक राजाराम देसले यांच्या सुनबाई होत.त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तरी त्यांचा दशक्रिया विधी 16फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर येथे व उत्तरकार्य विधी 17 रोजी राहत्या घरी मोहिपाडा येथे होणार असल्याचे देसले कुटुंबियांनी कळविले आहे.
.