
(किन्हवली 28 जुलै ):सामाजिक जाणीव ठेऊन प्रयास ट्रस्ट या संस्थेने सोगाव विद्यालयात सुमारे अडीचशे (२५०) विद्यार्थ्यांना छत्री वाटप केल्या. यावेळी प्रयास ट्रस्टच्या या छत्री वाटपाच्या अनोखा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या सोगाव विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मुंबई येथील प्रयास ट्रस्ट (एल.अँड टी.) च्या वतीने छत्री वाटप कार्यक्रम आज सोगाव विद्यालय येथे झाला.
मुंबईच्या प्रयास ट्रस्टच्या अध्यक्षा मीना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एझील जयकुमार मॅडम, रंजना बन्सल मॅडम, कल्पना छत्रे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी सोगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जे. सावंत सर, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष हरड सर उपस्थित होते.
सोगाव विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर.एल राठोड सर, ए. डी. विशे, दिनेश वाघ सर, व्हि.जे.कुरकुटे सर,माया भडांगे मॅडम, ग्रंथपाल रेखा बांगर मॅडम, काळूराम फर्डे यांनी यावेळी सहाय्य केले.